। खोपोली । प्रतिनिधी ।
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर किलोमीटर 36 च्या दरम्यान अपघात झाला असून त्या सिमेंटच्या गाडीच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला.
एमएच 46 डीएम 7806 ही सिमेंटची गाडी बोरघाट उतरताना ढेकु गावच्या हद्दीत मुबंईकडे येताना रस्त्याच्या बाजुला खोल भागात पडली असून त्यातील चालक जागीच मृत झाला आहे. आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महामार्ग पोलीस बोरघाट, लोकमान्य रुग्णालयाची टीम, मृत्युंजय देवदूत, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी टिमच्या सदस्यांनी यावेळी मदत कार्य केले. या गाडीला एमएच 02 एफजी 1183 या आयचर टेम्पोने मागून धडक दिली. दरम्यान अपघाताची चौकशी खोपोली पोलीस करीत आहे.