| पनवेल | वार्ताहर |
भरधाव वेगाने चालवीत असलेली मोटारसायकल स्लिप होऊन झालेल्या अपघातात मोटार सायकलस्वारांचा दुर्दैवी मुत्यू झाला आहे. तर त्याचा सहकारी जखमी झाला असून, हा अपघात पनवेल जवळील चिंचपाडा ब्रिजकडे जाणाऱ्या मार्गावर झाला आहे. मोटारसायकलस्वार सचिन पवार (20) हा त्याचा मित्र विशाल जाधव (21) याला घेऊन मोटार सायकलीवरून पनवेल जवळील चिंचपाडा ब्रिज कडे जाणाऱ्या मार्गावर जात असताना त्याची मोटारसायकल स्लिप होऊन झालेल्या अपघातात सचिन पवार याचा दुर्देवी मुत्यू झाला आहे. तर विशाल जाधव हा जखमी झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
मोटारसायकल अपघातात एकाचा मृत्यू
