सावित्री नदीत बुडून एकाचा मृत्यू

| महाड | वार्ताहर |

मुलगा झाल्याने मित्रांसोबत आनंद साजरा करण्यासाठी सावित्री नदी संगमावर मित्रांसोबत गेलेल्या एकाचा शुक्रवारी (ता. 1) सायंकाळी बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मंगेश पांडुरंग ढवळे (35) असे त्याचे नाव आहे.पोलादपूर तालुक्यातील लोहारे देऊळकोंड गावातील मंगेश ढवळे मित्रांसमवेत नडगाव गावाजवळ सावित्री संगमावर पार्टी करण्यास गेला होता. नदीमध्ये पोहण्यासाठी उतरले असता दम लागल्याने मंगेशचा बुडून मृत्यू झाला. याबाबत राजेश शिवाजी शेडगे याने महाड औद्योगिक पोलिस ठाण्यामध्ये माहिती दिली असता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे मंगेशला मुलगा झाल्याने मित्रांना पार्टी देण्यासाठी तो ठिकाणी आला होता.

Exit mobile version