गटारामध्ये पडून एकाचा मृत्यू

| पनवेल | वार्ताहर |

नवीन पनवेलमधील सेक्टर 9 येथील 45 ते 50 वर्षीय गटारामध्ये पडून त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी खांदेश्वर पोलीस त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत.
निमिषा अपार्टमेंट, प्लॉट नंबर 12 -13 रोड नंबर दोन, सेक्टर नऊ, नवीन पनवेलच्या पाठीमागील बाजूस असलेल्या गटारात या इसमाचा मृतदेह सापडून आला.

त्याची उंची पाच फूट, डोक्याला टक्कल पडलेले आहे. त्याचा चेहरा गोल असून उजव्या हातावर राजयोग व त्याच्याखाली गाजा असे गोंदलेले आहे. छातीवर उजव्या बाजूला बदामामध्ये मा आणि डाव्या बाजूस शेर असे गोंदलेले आहे. तो अंगाने मध्यम असून अंगात निळ्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट व निळ्या रंगाची हाफ पॅन्ट घातली आहे.

Exit mobile version