भीषण अपघातात पोलीस कर्मचार्‍यासह एकाचा मृत्यू

। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात 2 ठार 1 जखमी झाल्याची घटना घडली आहे. पनवेल जवळील जेएनपीटी मार्गावर बंबावी पाडा येथील साई विभुती ढाब्यासमोर बुधवारी सकाळी एका ट्रेलरने त्याच्या पुढे चाललेल्या होंडा डिओ स्कुटी गाडीस पाठीमागून धडक दिली.

यामध्ये फिर्यादी निलेश कमल सिंग (25) हा जखमी झाला तर त्याचा सहकारी अक्षय घोले (25) याचा मृत्यू झाला. तसेच दुसर्‍या घटनेत पनवेल शहरातील मालधक्का रोड येथून पायी जात असलेल्या मुंबई दलात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असणारे शिवाजी सानप यांना एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. या दोन्ही अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version