खालापूरातील कारखान्यात कामगारांच्या अंगावर कोसळली धुराची चिमणी , एकाचा मृत्यु तर तिघेजण गंभीर जखमी

कामगारांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आल्यावर कामगारांचा गेट बदं आंदोलन
| खोपोली | प्रतिनीधी |
   
होनाड ग्रामपंचायत जयंसिंग अलाँईज प्रा. लि.कारखान्यात दि. २७ जानेवारी रोजी सकाळी १० च्या सुमारास कपंनीच्या धुरांडाची चिमणी वा-याच्या वेगामुळे कपंनीच्या आवारात कोसळली असता एक परप्रांतीय कामगाराचा मृत्यु  तर तीन कामगार गंभीर जखमी झाल्याने दुस-या दिवशी सकाळी सर्व कामगारांनी एकत्र येऊन अचानक गेट बदं आंदोलन करुन कपंनीतील काम बंद पाडल्याने पोलीसांनी येऊन तेथील कामगारांशी बोलणी केली तरीही कामगार तात्काळ भरपाईची मागणी करत दि.२८ जानेवारी रोजी कामगारांना गेट बंद आंदोलन केले पोलिसांनी यशस्वी मध्यस्थी केल्यावर कामगांरांनी आंदोलन मागे घेतले.

खालापुर तालुक्यातील होनाड पचांयत मधील जयंसिगं अलाँईज प्रा. लि. या वाहनाच्या स्पेयर साठी लागणा-या धातुचे ईंगोट ची निर्मिती करणा-या  कपंनीमध्ये २७ जानेवारी रोजी सकाळी १० च्या सुमारास कपंनीच्या धुरांडाची चिमणी वा-याच्या वेगामुळे कपंनीच्या आवारात पडुन चार कामगार जखमी झाले. तात्काळ सर्व कामगारांना खोपोलीतील पार्वती हाँस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले. सध्यांकाळी यातील एक कामगार संजय सहानी (रा. उत्तर प्रदेश) याचा मृत्यु झाला तर अनिल सहानी, विनोद गौड, विजय यादव जखमी सर्व राहणार उत्तर प्रदेशचे गंभीर जखमी झाले.जखमींना तात्काल खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरूवार दि. २८ जानेवारी रोजी सकाळी सर्व कामगार कामावर आल्यावर सर्व परप्रांतीय कामगारांनी अचानक कोणतीही कल्पना न देता गेटवर जाऊन गेट रोखुन धरत घोषणाबाजी करीत गेट बंद करुन आंदोलन सुरु केल्याने चिचंवली, होनाड परिसरात वातावरण तंग होऊन आडोशी रोड वरील वाहतुकीवर परिणाम झाला.दरम्यान खोपोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेष कळसेकर, हवालदार संतोष रुपनवर यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचून व्यवस्थापनाकडून विशाल तलरेजा व इतर स्टाफ यावेळी कामगारांशी बोलणी करायला पुढे आले.त्यांनी चिडलेल्या कामगारांसोबत बोलणी केली व अचानक केलेले आंदोलन बेकायदेशीर असुन तात्काळ आंदोलन बंद करुन गेट सोडुन जावे यासाठी विनंती केली परंतु कामगार ऐकण्याच्या मनस्थीतीत नसल्याचे पाहुन पोलीस व्हँन च्या स्पीकरवरुन पाच मिनीटात आंदोलकांना आंदोलन बदं करण्याचा इशारा दिल्या नतंर आंदोलक पागंले व घरी निघुन गेल्याने अखेर जयसिगं कपंनीसमोरील तणाव निवळला.      या घटनेचा खोपोली पोलीस स्टेशनमध्ये भा.दं.वि.कलम ३०४ अ, ३३७, ३३८ प्रमाणे रितसर गुन्हा दाखल करण्यात आला.

Exit mobile version