| रसायनी | प्रतिनिधी |
भरधाव वेगातील मोटार सायकलवरील चालकाने रस्ता ओलांडणाऱ्या चार जणांपैकी एकाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्या इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील पोयंजे हद्दीतील बालाजी पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर घडली.
यामध्ये मयत धिरज भुया (40 रा. ठोंबरेवाडी) व त्याचे इतर तीन साथीदार असे जुना पुणे-मुंबई महामार्गावरुन बालाजी पेट्रोल पंपासमोरुन पायी रस्ता ओलांडत असताना हिरोहोंडा स्प्लेंडर गाडीवरुन आलेला चालक शिवशंकर मंडल याने त्याच्या ताब्यातील मोटार सायकल भरधाव वेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून धीरज भुया यांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात ते गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.