| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव शहरातील खांदाड येथील इमारतीच्या टेरेसवरून दारूच्या नशेत खाली पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत रंजित मुन्नू भारती (35), मूळ रा. राघेपटह, जि. गोरखपूर हा दारू पिऊन दारुच्या नशेत खांदाड येथील इमारतीच्या टेरेसवर फोनवर बोलत होता. दरम्यान, त्याचा तोल जाऊन तो टेरेसवरुन बिल्डींगचे खाली उभे असलेल्या स्कुल बसचे टपावर पडला. त्यास उपचाराकरीता दि. 11 डिसेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तपासुन मयत घोषीत केले. या घटनेची नोंद माणगांव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पो. नि. निवृत्ती बोर्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक काळे करीत आहेत.