। चंद्रपूर । वृत्तसंस्था ।
वरोरा मतदार संघात उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित मांसाहार पार्टीत दोन मद्यधुंद कार्यकर्ते विहिरीत पडले. त्यातील एकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना उमेदवार मतदारांना मांसाहारी व शाकाहारी पार्टी, दारू पार्टीचे प्रलोभन देत आहेत. अशा पार्टी दररोज आयोजित केल्या जात आहेत. जेवणावळीची धूमधाम सुरू असताना कार्यकर्ते दारूच्या नशेत झिंगून पडत आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी रविवारी पार्टीचे आयोजन केले होते. फतेहपूरच्या गिट्टी क्रशर कॉम्प्लेक्समध्ये मटण पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये दारूचीही व्यवस्था करण्यात आली होती. पार्टीदरम्यान मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दोन कार्यकर्त्यांचा तोल गेला आणि ते जवळच्या विहिरीत पडले.अरुण महाले या एका कामगाराची वेळीच सुखरूप सुटका करण्यात आली, मात्र दुसरा कामगार गजानन काळे अद्याप बेपत्ता आहे. घटनेची माहिती मिळाल्यापासून मदत आणि बचावकार्य सुरू आहे, मात्र रात्रीचा अंधार असल्याने त्यांना विहिरीतून बाहेर काढता आले नाही. परिणामी त्याचा मृत्यू झाला.