। उरण । प्रतिनिधी ।
सोनारी गावातील भाजपचे अध्यक्ष प्रकाश कडू यांनी प्रीतम म्हात्रे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यामुळे भाजपला खिंडार पडले आहे.
विधानसभा निवडणूकीचा प्रचार उत्तरोत्तर रंगत असताना, जनतेच्या प्रश्नांशी बांधिलकी ठेवणार्या शेतकरी कामगार पक्षाकडे सर्वसामान्य कार्यकर्ते, नेते यांचा ओघ मोठ्या प्रमाणात सुरु असून तो दिवसोंदिवस वाढतच आहे. यावेळी प्रीतम म्हात्रे यांच्या उपस्थितीत सोनारी गावातील भाजपचे अध्यक्ष प्रकाश कडू यांनी शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. शेतकरी कामगार पक्षच खर्या अर्थाने लोकांच्या प्रश्नावर लढतो. यामुळे आम्ही शेतकरी कामगार पक्षाचे कार्य करणार असल्याचे प्रकाश कडू यांनी सांगितले.