| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान शहरात मागील दोन महिन्यांपासून विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. त्यामुळे या विजेच्या प्रश्नावर स्थानिक आक्रमक झाले आहे. यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी स्थानिकांसह महावितरणच्या ग्राहकांकडून एक बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत महावितरणचे उप अभियंता चंद्रकांत केंद्रे यांनी सर्व ग्राहकांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच, शहरासाठी मागील दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विकास कामांना मंजुरी मिळाली असल्याचे जाहीर केले. दरम्यान, पुढील 10 दिवसांत तीन ठिकाणी नवीन वीज रोहित्र बसवून दिले जातील आणि मंजूर असलेली सर्व कामांना सुरुवात केली जाईल, असे आश्वासन उपअभियंता केंद्रे यांनी दिले. यावेळी महावितरणचे उपअभियंता चंद्रकांत केंद्रे, सहायक अभियंता सचिन आटपाडकर आदींसह माथेरान उप नगराध्यक्ष संतोष शेलार, विरोधी पक्षनेते सीताराम कुंभार, नगरसेवक अर्चना भिलारे, नगरसेवक र्गौंग वाघेला, रिझवान शेख, स्वीकृत नगरसेवक प्रवीण सकपाळ, माजी उप नगराध्यक्ष राजेश दळवी, कुलदीप जाधव, राजेश चौधरी, चंद्रकांत जाधव, गिरीश पवार, योगेश जाधव, अनंता शेलार, संतोष बर्गे, मंगेश सकपाळ, पवन कदम, भास्कर शिंदे उपस्थित होते.







