मोटार सायकल अपघात एकाचा मृत्यू

| पनवेल | वार्ताहर |

भरधाव वेगातील मोटार सायकलवरील चालकाने रस्ता ओलांडणार्‍या चार जणांपैकी एकाला धडक दिली. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

सदर घटना, पनवेल जवळील पुणे-मुंबई महामार्गावर बालाजी पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावरील पुणे-पनवेल लेनवर घडली आहे. या अपघात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव धिरज भुया (40) ठोंबरेवाडी हा व त्याचे इतर तीन साथीदार पुणे-मुंबई महामार्गावरुन बालाजी पेट्रोल पंपासमोरुन पायी रस्ता ओलांडत असताना, हिरोहोंडा स्प्लेंडर गाडीवरुन आलेला चालक शिवशंकर मंडल याने त्याच्या ताब्यातील मोटार सायकल भरधाव वेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवून मृत्यू व्यक्तीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात ते गंभीररित्या जखमी होवून त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास पनवेल पोलीस करीत आहेत.

Exit mobile version