। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग-कार्लेखिंड मार्गावरील रेवदंडा बायपास येथे ट्रक व मोटार सायकलचा अपघात झाला. यामध्ये दोघेजण जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला.
रेवदंडा बायपासवरुन पेणच्या दिशेने दोघेजण मोटार सायकलवरुन जात होते. एचपी पेट्रोल पंपाजवळील रस्त्यावर असलेले खड्डे चुकवित असताना मोटार सायकलस्वाराचा ताबा सुटल्याने मोटार सायकल डंपर खाली गेल्याने अपघात झाला. ही घटना सकाळी 11.30 च्या दरम्यान घडली. या अपघातात मोटार सायकलचा चक्काचुर झाला.