एक परिवार,एक तिकीट-उत्तराखंडमध्ये फतवा

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
उत्तराखंडमध्ये होणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने एक परिवार,एक तिकीट हे धोरण राबविण्याचा निर्णय् घेतला आहे. तसा आदेशच काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी जारी केला आहे.यामुळे पक्षातील प्रस्थापितांना धक्का बसणार आहे. उत्तराखंडमध्ये काँग्रेसचे बहुतांश नेते आता रिटायरमेंटच्या वयात आहेत आणि त्यांना चिंता आहे ती त्याच्या मुलाबाळांची. आताच्या विधानसभा निवडणुकीतही स्वत: आणि सोबत स्वत:च्या पोराबाळांना तिकीट देण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरु झालंय. त्यात खुद्द मुख्यमंत्रीपदाचे काँग्रेसचे दावेदार हरिश रावत यांचाही समावेश आहे. राहुल गांधींच्या निर्णयाचा त्यांनाही फटका बसणार आहे.

Exit mobile version