रोह्यात थरार! एकाने नदीत ढकलले, दुसर्‍याने वाचविले

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रविवारी रात्री दोन मित्रांत काही कारणास्तव आपसात भांडण झाले, भांडण विकोपाला गेले, भांडणाचा राग धरून एका मित्राला दुसर्‍या मित्राने थेट पुलावरून कुंडलिका नदीत ढकलून दिल्याची धक्कादायक घटना घडली.

वाहत्या प्रवाहात वाहून जाणारा तो तरुण जिवाच्या आकांताने मदतीची याचना करू लागला. याचवेळी तरुण बुडत असल्याची वार्ता समजतात अनेकांनी कुंडलिका काठी गर्दी केली. लगेचच अष्टमीतील जिगरबाज तरुण ओंकार सरपाटील, योगेश गोडकीचा यांनी मागेपुढे न पाहता थेट नदीत उडी घेतल्याचा थरारनाट्य पाहायला मिळाला. सर्वत्र चर्चा सुरू झाली. त्या बुडत्या तरुणाला वाचविले आणि सर्वांनीच सुटकेचा निःश्‍वास सोडला.शहरातील दोन परप्रांतीय तरुण गप्पाटप्पा करीत अष्टमी पुलावरून जात होते. त्यांच्यात काहीसे वाद झाले. एका मित्राला राग अनावर झाले, त्याच मित्राने दुसर्‍या मित्राला थेट कुंडलिकेच्या पात्रात ढकलून दिल्याचे समोर आले.

नदीच्या वाहत्या पाण्यात पडलेला तरुण वाचण्यासाठी धडपड करू लागला. मग पाहणार्‍या लोकांनी वाचवा अशी ओरड केली. ही ओरड ऐकताच अष्टमीतील ओमकार सरपाटील, योगेश गोडकीचा यांनी जीव धोक्यात घालून त्या तरुणाला वाचविण्याचे सत्कार्य केले, हे दोघेही वादाडीत मित्र परप्रांतीय असल्याचे सांगण्यात आले. त्यातील बुडणार्‍या मित्राला स्थानिक तरुणांनी वाचवल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.

सोशल मीडियावर बुडणार्‍या तरुणाला वाचविणार्‍या तरुणांचे खूप कौतुक झाले. दरम्यान वाद कशावरून झाले, त्याबाबतची तक्रार करण्यात न आल्याने नेमका प्रकार काय? हे अद्याप समजू शकलेले नाही, मात्र असे मित्रातील वाद जीवावर बेतू शकतो, हे अधोरेखित झाले

Exit mobile version