चिंतामणराव केळकर विद्यालयाचा दहाव्या वर्षी शंभर टक्के निकाल

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत अलिबाग येथील चिंतामणराव केळकर विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला. शाळेतील एकूण 129 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सलग दहाव्या वर्षी शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
इंग्रजी माध्यमात श्रेया सुशील कडीकर पहिली आली. तिने 96.40 टक्के गुण मिळवून शाळेत सर्व विद्यार्थांमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला. सेमी इंग्रजी माध्यमात इशा राजकुमार मलशेट्टी 93.60 टक्के गुण मिळवून प्रथम आली. मराठी माध्यमात पारस अभय गंद्रे पहिला आला, त्याने 85 टक्के गुण मिळवले. 9 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले. 38 विद्यार्थ्यांना 80 टक्यांपेक्षा जास्त गुण मिळाले .44 विद्यार्थ्याना 70 टक्क्यांपेक्ष्या जास्त गुण मिळाले. 24 विद्यार्थ्यान 60 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले.

Exit mobile version