• Login
Friday, May 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

दहावीचा निकाल जाहीर; यावर्षीही मुलींनीच मारली बाजी

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 8, 2026
in अलिबाग, रायगड, शैक्षणिक
0 0
0
दहावीचा निकाल जाहीर; यावर्षीही मुलींनीच मारली बाजी
0
SHARES
9
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | प्रतिनिधी |

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे फेब्रुवारी व मार्चमध्ये इयत्ता दहावीची परिक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेचा निकाल शुक्रवारी (दि.) 8 मे रोजी मंडळाच्या संकेतस्थळांवर दुपारी जाहीर करण्यात आला. त्यात रायगड जिल्ह्याचा निकाल 98.03 टक्के लागला आहे. निकालात मुलांच्या तुलनेत मुलींनी बाजी मारली असून, मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 96.44 टक्के तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 93.70 टक्के इतके आहे.

परमार स्कूलमध्ये 25 विद्यार्थी उत्तीर्ण

नागोठण्यातील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या वेलशेत येथील शैक्षणिक संकुलातील एस. डी. परमार इंग्लिश मिडीयम स्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल 100 टक्के लागला आहे. शाळेचे सर्व 25 विद्यार्थी या परिक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये आर्यन चितळे 82.40 टक्के, ज्योझी पानसरे 82.20 टक्के व इझान सय्यद 80.80 टक्के हे विद्यार्थी अनुक्रमे पहिला तीन क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे भा. ए. सो.चे संस्थापक, अध्यक्ष किशोर जैन, उपाध्यक्षा संगीता जैन, शाळा समिती चेअरमन सुरेश जैन, भाएसोचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक जैन व मुख्याध्यापिका अमृता गायकवाड यांनी अभिनंदन करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

कुरुळच्या तीन विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी

कुरुळ येथील सु.ए.सो माध्यामिक विद्यालयाचा एसएससी परीक्षा फेबुवारी-मार्च 2026 चा निकाल 95 टक्के इतका लागला आहे. एकूण 20 विद्यार्थ्यांपैकी 19 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तीन विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी प्राप्त झाली आहे. पाच विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी, सात विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी, चार विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीमध्ये आहेत. चिन्मयी पाटील प्रथम क्रमांक 83.40 टक्के गुण, पायल घोरपडे द्वितीय क्रमांक 82.00 टक्के गुण, निशा राठोड तृतीय क्रमांक 77.80 टक्के गुण मिळाले आहेत. कुरुळ येथील या माध्यामिक विद्यालयात बहुसंख्य अमराठी विद्यार्थी शिक्षण घेतात. अशा परिस्थितीत देखील शाळेचा निकाल दरवर्षी अतिशय उत्तम लागतो. त्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे शाळेचे चेअरमन ॲड. प्रसाद पाटील व मुख्याध्यापिका सुजाता पाटील यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

नांदगावात मुलींनी मारली बाजी

संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव या विद्यालयाचा दहावीचा निकाल 93.61 टक्के लागला आहे. यावर्षी मुलींनी बाजी मारली आहे. नांदगाव विद्यालयात पूजा खैरे या विद्यार्थीनी 91.80 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. द्वितीय अनुष्का नरेश शिंदे 91.60 टक्के, तृतीय मिहीर नागेश सायगावकर 90 टक्के, चतुर्थ स्वरूपा शिंदे 83.80 टक्के, पाचवा श्रद्धा खैरे 83.40 टक्के या तसेच दहावीच्या सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सुरेश खैरे, प्राचार्य, शिक्षक वृंदांनी कौतुक करून अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सोहम सुर्वे तालुक्यात तालुक्यात प्रथम

तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे गो. म. वेदक विद्यामंदिर तळाचा एकूण निकाल 90.14 टक्के लागला असून, सोहम सुर्वे तालुक्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. यामध्ये गो.म.वेदक विद्यामंदिर शाळेत प्रथम क्रमांक सोहम सुर्वे 87 टक्के गुण, द्वितीय क्रमांक निर्जला कीर्तने 84.40 टक्के व तृतीय क्रमांक स्वरा गायकवाड 83.80 टक्के घेऊन उत्तीर्ण झाली. या केंद्रातून एकूण 71 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी 64 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, 7 विद्यार्थी नापास झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याला कलाटणी देणारा हा दहावीचा निकाल असल्याने याकडे विद्यार्थी व सर्व पालकांचे लक्ष लागले होते. ग्रामीण दुर्गम डोंगराळ भाग असलेल्या तळा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी शिक्षणात नेहमीच चांगल्या प्रकारे प्रगती केलेली दिसत आहे. तालुक्यात तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे गो. म. वेदक. विद्यामंदिर तळा या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी 10वी च्या परिक्षेत मिळविलेल्या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी प्राचार्य शिक्षक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

पेण शिक्षण महिला समिती विद्यालयाचे 55 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इ. 10वी. परीक्षेचा निकाल 8 मे 2026 रोजी ऑनलाईन जाहीर झाला असून, यंदाही पेण शिक्षण महिला समितीच्या इंग्रजी माध्यम शाळेतील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवत 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.


स्वरांजली पाटील 94.80 टक्के प्रथम क्रमांक, विराज योगेश लकेश्री 94.80 टक्के प्रथम क्रमांक, गार्गी गोरी 93.20 टक्के द्वितीय क्रमांक, पार्थ साळुंखे तृतीय क्रमांक याशिवाय 55 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून, 21 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. संस्थेच्या अध्यक्षा सुहासिनी देव, उपाध्यक्षा मेधा देवधर, कार्यकारिणी मंडळ तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी शिंदे, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

कर्जत इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये अनन्या यादव सर्वप्रथम

कर्जत एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये दहावी शालांत परीक्षेत अनन्या यादव हिने 97 . 40 टक्के गुण मिळवून सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळविला. 117 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि सर्व मुले उत्तीर्ण झाल्याने शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. अनन्या यादव 97. 40 टक्के गुण प्रथम, स्वराज शिंदे 93.20 टक्के गुण द्वितीय, भार्गव मुंढे 92.20 तृतीय क्रमांक मिळविला.

मुरूड अंजुमन इस्लाम जंजिरा हायस्कूल 93.58 टक्के निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या 10 च्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात मुरूड अंजुमन इस्लाम जंजिरा आगरी हायस्कूल आणि ज्युनिअर महाविद्यालय मुरुड-जंजिरा यंदा ही मुलींनी बाजी मारली आहे. तुबा सज्जाद मोझर 90.40 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, आमना रहिद पठाण 89.60 टक्के गुण मिळवून व्दितीय क्रमांक पटकावला तर फातिमा शिघ्रेकर हिने 89.40 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.

पोटफोडे विद्यालयाचा उज्ज्वल निकाल

रोहा तालुक्यातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचलित श्री. रा. ग. पोटफोडे (मास्तर) विद्यालय खांब या विद्यालयाने इ.10 वीच्या परीक्षेच्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखून ठेवली असून, विद्यालयाचा एकूण निकाल 84.09 टक्के इतका लागला.


ईश्वरी अधिकारी या विद्यार्थ्यांनीने 88.00 टक्के संपादित करून विद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान पटकावला आहे. रोहिणी घोगळे 87.40 गुण द्वितीय, आयुष जाधव 87.00 तृतीय, सई तुपकर 86.60टक्के चतुर्थ तर आर्य शेळके 85.20टक्के गुण मिळाले. विद्यार्थी वर्गाच्या या यशाबद्दल चेअरमन महेंद्र पोटफोडे, उपाध्यक्ष प्रकाश थिटे, सचिव धोंडू कचरे व सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक सुरेश जंगम व सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी वर्ग तसेच विभागातील शिक्षणप्रेमी नागरिक यांनी अभिनंदन व्यक्त करून शुभेच्छा दिल्या आहेत.

होली एंजल्स स्कूलमध्ये मुलींचे वर्चस्व

नागोठण्यातील नीव सोशियल ॲण्ड एज्युकेशन ट्रस्टच्या होली एंजल स्कूलचे सर्व 66 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने शाळेचा निकाल सलग 11 व्या वर्षी 100 टक्के लागल्याने शाळेने आपल्या उज्वल यशाची परंपरा यावर्षीही कायम राखली आहे.


होली एंजल्स स्कूलमध्ये हर्षदा शिरसे ही विद्यार्थिनी 90 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तर सिद्धी भोईर 89.80 टक्के गुण, शाल्मली जवके 88.20 टक्के गुण या दोन विद्यार्थिनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे चेअरमन विजय मुल्कवाड, सीईओ रूधीरा मुल्कवाड, ट्रेझरर रेचल मुल्कवाड, हेड मिस्ट्रेस नीलिमा राणे, उपमुख्याध्यापक मुकेश मिसळ यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

निकम इंग्लिश स्कुलचा 97.89 टक्के निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी शालांत परीक्षेचा निकाल शुक्रवार दि.8 रोजी जाहीर झाला. या परीक्षेत शैक्षणिक क्षेत्रात आग्रेसर असणाऱ्या माणगाव येथील एस.एस.निकम इंग्लिश स्कुलने आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. या शाळेचा दहावी परीक्षेचा एकूण निकाल 97.89 टक्के लागला असून अदित्य छेडा, आयुष डवले या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे 93.40 टक्के इतके गुण संपादन करून शाळेमध्ये सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला आहे.

या शाळेमधून नायाब वाडेकर, मुक्ता बेंडखळे, रिद्धी उभारे या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे 93 टक्के इतके गुण संपादन करून द्वितीय क्रमांक, साजिरी गायकवाड या विद्यार्थिनीने 91.60 टक्के गुण संपादन करून तृतीय क्रमांक, ऋतुजा खडतर या विद्यार्थिनीने 91.20 टक्के गुण मिळवत चतुर्थ क्रमांक, संस्कार म्हसकर व अद्वैत वैभव कोकणे या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे 90 टक्के गुण संपादन करून पाचवा क्रमांक पटकावत शाळेच्या यशामध्ये मानाचा तुरा रोवला आहे. या शाळेमधून यावर्षी दहावी परीक्षेसाठी एकूण 95 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 93 विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेत 9 विद्यार्थ्यांना 90 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त झाले असून, विशेष श्रेणीत 42 विद्यार्थी असून प्रथम श्रेणीत 33 तर द्वितीय श्रेणीत 9 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

रोहा पब्लिक स्कुलचा 100 टक्के निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी परीक्षेचा सन 2025-26 या वर्षाचा निकाल जाहीर केला आहे. सालाबादप्रमाणे यंदा ही या शाळेने उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. यंदा शाळेचा 100 टक्के निकाल लागला असून, सलग 7 वर्ष शाळेचा 100 टक्के निकाल लागत आहे. यंदाच्या परीक्षेत विशेष प्रविण्यासह प्रथम श्रेणीत 11 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 18 विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीत 12 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. रोहा पब्लिक स्कुल शाळेतील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलेले असून, शाळेतील विद्यार्थीनी साची देशमुख हिने 82.80 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान पटकावला आहे. तर निल मिरवणकर याने 82.60 टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक तर अष्टमी येथील सई चांदगावंकर हिने 81.00 टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळविला आहे. सर्व गुणवंत व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष समीर सकपाळ, समिधा सकपाळ, हसमुख जैन, मकरंद बारटक्के, सई सकपाळ, सौषा सूरज, संघ मित्र डोंगरदिवे व अन्य मान्यवरांनी तसेच शिक्षक कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे.

अशोकदादा साबळे विद्यालयाने गुणवत्तेचा उमटवला ठसा

माणगाव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अशोकदादा साबळे विद्यालय व माणगाव ज्युनिअर कॉलेज यांनी इयत्ता दहावी फेब्रुवारी/मार्च 2026 परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत 93.83 टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांच्या अथक मेहनतीला शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य लाभल्याने विद्यालयाने यंदाही गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे.

यावर्षी विद्यालयातून एकूण 146 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 137 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, विद्यालयाचा एकूण निकाल 93.83 टक्के लागला आहे. विशेष म्हणजे 24 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवत शाळेचा मान उंचावला आहे. तसेच 47 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 45 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर 21 विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यालयातून ओमकार वरपे याने 460 गुण मिळवत 92.60 टक्क्यांसह प्रथम क्रमांक पटकावला तर स्वरुपा धावडे हिने 441 गुणांसह 88.20 टक्के मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला. सोहम धर्मसाले याने 435 गुणांसह 88 टक्के मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. तसेच पूजा चव्हाण हिने 434 गुणांसह 87.80 टक्के, तर सई तेटगुरे हिने 437 गुणांसह 87.40 टक्के गुण मिळवत विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीत स्थान मिळविले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. राजीव अशोक साबळे, कृष्णा गांधी, नरेंद्र गायकवाड, आर. एच. पाटील, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

उर्दू हायस्कूलचा 96.55 टक्के निकाल

रोहा तालुक्यातील उर्दू माध्यमाचे एकमेव हायस्कूल असलेल्या नागोठण्यातील नामांकित नागोठणे एज्युकेशन सोसायटीच्या उर्दू हायस्कूलचा दहावीच्या परीक्षेचा निकाल 96.55 टक्के लागला आहे.

यामध्ये कुमार फैज नझीर अधिकारी हा विद्यार्थी 92.40 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. तर नाफिया छडीदार 90 टक्के व झैबा अधिकारी 87 टक्के या दोन विद्यार्थिनी अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी उर्दू हायस्कूलचे 29 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 28 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये उच्च प्रथम श्रेणीत 9, प्रथम श्रेणीत 13, द्वितीय श्रेणीत 3 तर उत्तीर्ण श्रेणीत 3 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नागोठणे उर्दू हायस्कूलचा माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल चांगला लागल्यामुळे नागोठणे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष समादशेठ अधिकारी, जनरल सेक्रेटरी लियाकत शैख अलि कडवेकर, व्यवस्थापकीय संचालक सगिर अधिकारी, शब्बीर पानसरे, डॉ. सादिया दफेदार, शाळेचे प्राचार्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

वाघरे स्कूलचे उल्लेखनीय यश

माणगाव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गणेश यशवंत वाघरे इंग्लिश मीडियम स्कूल, माणगाव यांनी सन 2025-26 च्या एस. एस. सी. परीक्षेत शंभर टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेच्या या दैदिप्यमान यशामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक व संपूर्ण माणगाव परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यंदाच्या परीक्षेसाठी एकूण 41 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते आणि विशेष म्हणजे सर्व 41 विद्यार्थी यशस्वी ठरले. कठोर परिश्रम, नियमित अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा याच्या बळावर विद्यार्थ्यांनी हे यश मिळविले आहे. शाळेच्या सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हीच खरी पावती मानली जात आहे. निकालाच्या गुणवत्तेचा विचार करता 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे 3 विद्यार्थी, 80 ते 90 टक्के गुण मिळविणारे 8 विद्यार्थी, 70 ते 80 टक्के गुण मिळविणारे 10 विद्यार्थी, 60 ते 70 टक्के गुण मिळविणारे 9 विद्यार्थी, 50 ते 60 टक्के गुण मिळविणारे 7 विद्यार्थी तर 40 ते 50 टक्के गुण मिळविणारे 4 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या निकालातून विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण प्रगती आणि शाळेची शैक्षणिक बांधिलकी स्पष्टपणे दिसून येते. शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांनी विशेष चमकदार कामगिरी केली. कायापक तन्वी हिने 94.40 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. विश्वकर्मा प्रतिभा हिने 94.00 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. पलकर निधी हिने 90.00 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवत शाळेचा मान उंचावला. तसेच अडे आरती (87.60 टक्के), वाडेहवाळ भरगव (86.60 टक्के), कोळेकर राजवर्धन (85.40 टक्के), भोंकर आयुष निलकंठ (84.60 टक्के), वैकुळ पार्थवी गुरुप्रसाद (83.40 टक्के), परमार पार्थ प्रकाश (82.80 टक्के) आणि पोटाळे पार्थ सुरेश (82.60 टक्के) यांनीही उलेलेखनीय यश संपादन करत शाळेच्या गुणवंत परंपरेत भर घातली.

म्हसळा तालुक्याचा उत्तम निकाल

मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल म्हसळ्याची विद्यार्थिनी तनुष्का कदम हिने 93. 02 गुण मिळवून प्रथम येण्याचा मान मिळविला. श्रेयस पवार याचा द्वितीय क्रमांक 88. 06 टक्के गुण, मोरे श्रेया तिसरा क्रमांक 87. 04 टक्के गुण, श्रवण गायकर चौथा क्रमांक 87 टक्के गुण, वैभवी मगर पाचवा क्रमांक 85. 08 टक्के गुण मागासवर्गीयांमध्ये श्रेया मोरे प्रथम 87. 04 टक्के गुण, द्वितीय क्रमांक श्रवण गायकर 87 टक्के गुण, तृतीय क्रमांक श्रावणी नांदगावकर 86. 06 टक्के गुण मिळाले आहेत. म्हसळा तालुक्यातील इतर शाळांचे निकाल खालील प्रमाणे आंबेत हायस्कूल 100 टक्के, न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा 98. 88 टक्के, अंजुमन हायस्कूल म्हसळा 96. 96 टक्के, आयडियल इंग्लिश स्कूल म्हसळा 100 टक्के, खामगाव हायस्कूल 100 टक्के, पांगलोली हायस्कूल 100 टक्के, खरसई हायस्कूल 88. 23 टक्के, देवघर हायस्कूल 85. 71 टक्के, नेवरूळ हायस्कूल 91. 66, पाभरे हायस्कूल 78. 12 टक्के, आगरवाडा हायस्कूल 87. 50 टक्के, गोंडघर हायस्कूल 91. 66 टक्के, केलटे हायस्कूल 80 टक्के, पाष्टी हायस्कूल 97. 23 टक्के, संदेरी हायस्कूल 100 टक्के, मेंदडी हायस्कूल 55. 55 टक्के, व्हिजन इंटरनॅशनल स्कूल 100 टक्के लागला आहे.

माध्यमिक विद्यामंदिर रातवड विद्यालयाचे यश

छत्रपती शिक्षण मंडळ संचालित माध्यमिक विद्यामंदिर रातवड विद्यालयाचा शालांत परीक्षा फेब्रुवारी /मार्च 2026 चा निकाल 100 टक्के लागला असून, विद्यालयाने सलग तेराव्या वर्षी 100 टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.


विद्यालयाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यंदा विद्यालयातून एकूण 14 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी सर्व 14 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण संपादन करून विद्यालयाच्या यशात भर घातली आहे. विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये संस्कृती ऐत हिने 93.80 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. अंतरा पवार हिने 84.60 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर निधी जंगम हिने 83.80 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक संपादन केला. निकालामध्ये विशेष श्रेणीत 11 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 1 विद्यार्थी तसेच द्वितीय श्रेणीत 2 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

मोर्बा युनायटेड इंग्लिश स्कुलमध्ये अम्मारा अकलेकर सर्वप्रथम

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी शालांत परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि.) 8 मे रोजी ऑनलाईन जाहीर झाला. या परीक्षेत माणगाव तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या युनायटेड इंग्लिश स्कुल मोर्बा शाळेने सलग दुसऱ्यावर्षी दहावी परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन करताना या शाळेचा दहावी परीक्षेचा एकूण निकाल 100 टक्के इतका लागला असून, अम्मारा म.हनीफ अकलेकर या विद्यार्थिनीने 91 टक्के इतके गुण संपादन करून शाळेमध्ये सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला आहे.

या शाळेमधून अनया गंगरेकर या विद्यार्थिनीने 90.40 टक्के गुण संपादन करून द्वितीय क्रमांक तर महीन गंगरेकर या विद्यार्थिनीने 89.60टक्के गुण संपादन करून तृतीय क्रमांक पटकावत शाळेच्या यशामध्ये मानाचा तुरा रोवला आहे. या शाळेमधून यावर्षी दहावी परीक्षेसाठी एकूण 22 विद्यार्थी बसले होते हे सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 12 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले असून, 9 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 1 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या शाळेचा सलग दुसऱ्यावर्षी दहावीचा निकाल नेत्रदीपक लागल्याने पालक वर्गांमध्ये तसेच विद्यार्थ्यांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण आहे. भविष्यात ही शाळा आणखी नावारूपाला येईल अशी आशा मोर्बा विभागातील नागरिकांनी बोलून दाखविली आहे. दहावीत विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केल्याने संस्था पदाधिकारी यांनी शिक्षकांचे खास अभिनंदन करून यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. राहील गंगरेकर, आमीन धनसे, समीर गंगरेकर, नासिर डावरे, आमीर डावरे, डॉ. फैसल, झोया बडे, नुसरत जालगावकर, सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी विशेष अभिनंदन करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Related

Tags: alibag newseducaional newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsssc result
Previous Post

महानगर गॅसच्या खोदकामाचा फटका; नऊ तास वीजपुरवठा बंद

Next Post

रेवदंड्यातील तरुणाई बरबादीच्या मार्गावर

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

पनवेल

लाखो लिटर पाण्याची चोरी

May 8, 2026
उरणमध्ये बिल्डरची मुजोरी
sliderhome

उरणमध्ये बिल्डरची मुजोरी

May 8, 2026
पेण येथील पशुवैद्यकीय विभाग व्हेंटिलेटरवर
sliderhome

पेण येथील पशुवैद्यकीय विभाग व्हेंटिलेटरवर

May 8, 2026
रेवदंड्यातील तरुणाई बरबादीच्या मार्गावर
sliderhome

रेवदंड्यातील तरुणाई बरबादीच्या मार्गावर

May 8, 2026
महानगर गॅसच्या खोदकामाचा फटका; नऊ तास वीजपुरवठा बंद
पनवेल

महानगर गॅसच्या खोदकामाचा फटका; नऊ तास वीजपुरवठा बंद

May 8, 2026
मोर्बा मॉडर्न इंग्लिश स्कूलचा नेत्रदीपक निकाल
माणगाव

मोर्बा मॉडर्न इंग्लिश स्कूलचा नेत्रदीपक निकाल

May 8, 2026
Next Post
रेवदंड्यातील तरुणाई बरबादीच्या मार्गावर

रेवदंड्यातील तरुणाई बरबादीच्या मार्गावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?