तीन वाहनांच्या अपघातात एक जखमी

| माणगांव । वार्ताहर ।

माणगांव तालुक्यातील मोर्बा विभागातील नाईटणे गावच्या हद्दीत तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एक जखमी झाल्याची घटना घडली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.13, 9.15 वा. च्या सुमारास मौजे नाईटणे गावच्या हद्दीत आरोपी इरफान सलीम हुदली, वय 27 वर्ष, रा. सुलेबागी, जि. बेळगाव राज्य बेळगाव याने त्याचे ताब्यातील ट्रक क्र. केऐ-22-डी-2181 हा अतिवेगाने, हयगयीने, बेदरकारपणे, रस्त्याचे परिस्तितीकडे दुर्लक्ष करुन चालवुन त्याचे समोरील ट्रक क्र. केऐ-22-डी-5249 यास ओव्हरटेक करून फिर्यादी यांचे ताब्यातील टेम्पो क्र. एमएच-43-वीएक्स-4917 हिस समोरुन उजच्या साईडला ठोकर मारून ओव्हरटेक करत असलेला ट्रक क्र. केऐ-22-डी-5249 ह्याच्या मध्यभागी धडक देऊन अपघात केला. या अपघातात तीनही वाहनांचे नुकसानीस तसेच ट्रक क्र. केऐ-22-डी-2181 मधील क्लिन्नर करीअप्पा मारुती पुजारी, रा. अंकलगी जि. बेळगाव राज्य बेळगाव याच्या लहान मोठे स्वरुपाचे दुखापतीस कारणीभू झाला. या अपघाताची नोंद माणगांव पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पो. नि. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स. फौ. भोजकर करीत आहेत.

Exit mobile version