पाच जण गंभीर जखमी
। पुणे । प्रतिनिधी ।
अक्कलकोट-तुळजापूर महामार्गावर शुक्रवारी (दि. 02) भीषण अपघात घडला. देवदर्शनाला चाललेल्या भाविकांच्या कारवर कंटेनर पलटी झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कारमधील सर्वजण देवदर्शनासाठी चालले होते. तुळजापूरचे दर्शन घेतल्यानंतर भाविक दुपारच्या सुमारास अक्कलकोटला चालले होते. यावेळी अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव गावाजवळ समोरून येणाऱ्या कंटनेर चालकाचा ताबा सुटला. त्यानंतर कंटेनर दोन वाहनांना धडक देत कारवर पलटला. या अपघातात कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे.