रिक्षाला अपघात; एक ठार, चौघे जखमी

| खोपोली | प्रतिनिधी |
खोपोली शिलफाटा येथील रिशिवन हॉटेलसमोरील वळणावर एक ऑटो रिक्षा पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण जागीच ठार, तर चार जण जखमी झाले आहेत. यात दोन लहान मुलांचा समावेश आहे. शिलफाटाकडून रिक्षा ढेकू गावाकडे जात येत असताना ही रिक्षा रिशिवन हॉटेलसमोरील वळणावर आली असता ती पलटी झाली. या अपघातात रिक्षामधीक एक जण जागीच ठार, तर चौघे जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ खोपोली नगरपालिका रुग्णालयात उपचारासाठी तात्काळ दाखल करण्यात आले.

Exit mobile version