। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल जवळील जेएनपीटी हायवे क्रमांक 348 च्या मार्गावर दुचाकी अपघातात चालकाचा मृत्यू झाला आहे. तर सहकारी जखमी झाला असून, या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मयूर कळसकर (25) राहणार पुणे, याने त्याच्या ताब्यातील दुचाकी पनवेल जवळील जेएनपीटी हायवे क्रमांक 348 च्या मार्गावर भरधाव वेगाने चालवून रस्त्याच्या डिव्हायडरला धडकून झालेल्या अपघातात तो जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला आहे. तर त्याच्या सहकारी विनायक तिलाखे (25) रा. पुणे हा जखमी झाला आहे.






