। रसायनी । प्रतिनिधी ।
भिलवले चौक हद्दीत भरधाव येणाऱ्या टेम्पोने दोन मोटारसायकलस्वारांना जोरदार धडक दिली. यात संजय भिकू भस्मा रा. पोखरवाडी, ता. खालापूर यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे जण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर पनवेल येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. टेम्पोचालक अपघातानंतर पसार होण्याचा प्रयत्न करत असताना चौक पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेतले.
हा अपघात इतका भीषण होता की, मृत संजय भस्मा हे चिरडले गेले. संजय भस्मा हे बाजारासाठी चौक येथे जात होते. त्यांच्या पश्चात दोन लहान मुले असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कर्जत-चौक रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असून रस्त्यावर मोठ्या भेगा पडल्या आहेत. काही ठिकाणी रस्ता पूर्ण झाल्यानंतरही दिशादर्शक पट्टे किंवा लावलेले नाहीत, त्यामुळे भरधाव वाहनचालकांकडून वारंवार अपघात होत आहेत.
भिलवले येथे टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू
