अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

। पनवेल । प्रतिनिधी ।

अज्ञात वाहनाच्या धडकेने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना पनवेल जवळील चिंचपाडा ब्रिज कळंबोली सर्कल ते चिंचपाडाकडे जाताना घडली आहे. सदर ठिकाणी रस्त्याच्या मध्य भागी एक व्यक्ती वय अंदाजे 55 ते 60 हे बेशुध्द अवस्थेत पडलेले होते त्यांना कोणत्यातरी अज्ञात वाहन चालकाने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारांसाठी रुग्णवाहिकेतून एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला आहे . या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version