धक्कादायक! भाडेकरूंच्या वादात खून

देवन्हावे गावातील घटनेने सर्वत्र खळबळ

। खोपोली । प्रतिनिधी ।

देवन्हावे गावातील एका खासगी खोलीत राहत असलेल्या दोघा परप्रांतीयांमध्ये अज्ञात कारणावरून वाद झाला. या वादात अकत्तर हबिद (मुळ रा. बैठा मधूवणी, बिहार) याने पारस हरिहर सिंह (50) याच्या डोक्यात मारल्याने त्याचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना गुरूवारी (दि.11) घडली. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला असून खोपोली पोलीस शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पारस हरिहर सिंह (वय 50, मूळ रा. खैरावा बिहार) हा मॅक्स स्पेअर कंपनीत कामाला होता. काही महिन्यांपूर्वीच त्याने कंपनीतील काम सोडून दुसऱ्या कंपनीत काम करत होता. ते देवन्हावे गावात खासगी रूमवर राहत होता. पारस आणि अकत्तर या दोघांनीही गावाला जाण्यासाठी आठवड्यापासून कंपनीत रजा काढली होती. याचदरम्यान पारस हरिहर सिंह आणि अकत्तर हबिद यांच्यात वाद झाले. या वादात अकत्तरने पारस हरिहर सिंह यांच्या डोक्यावर गंभीर दुखापत केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खोपोली नगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत असल्याचे घोषित केले. या घटनेनंतर आरोपी पसार झाला आहे.

या घटनेची बातमी खोपोली पोलीस ठाण्यात कळविताच पोलीस निरिक्षक सचिन हिरे घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सुजित गडदे करीत आहेत.

Exit mobile version