ट्रक रिक्षा अपघातात एक ठार

| पालघर | वार्ताहार |

रविवारी पहाटेच्या सुमारास तलासरी येथील रिक्षाचालक चारोटीकडून तलासरीच्या दिशेने जात असताना महालक्ष्मी मंदिराजवळ अपघात झाला. रिक्षाचालकाने समोर बंद असलेल्या ट्रकला पाहून रिक्षा थांबवली असता, मागून येणाऱ्या ट्रकने रिक्षाला जोरात धडक दिली. या अपघातात रिक्षाचा चुराडा झाला, तर रिक्षाचालक अरविंद वाघ (वय 42 वर्ष रा. तलासरी) यांचा जागीच मृत्यू झाला.

आज पहाटे तलासरी येथील रिक्षालाचालक अरविंद वाघ हे वेदांत रुग्णालय येथून भाडे घेऊन विक्रमगडला गेले होते. विक्रमगड येथे रुग्णाला सोडून तलासरीकडे जात असताना महालक्ष्मी मंदिर परिसरात समोर ट्रक उभा असल्याने त्यांनी रिक्षा थांबवली. पाठीमागून येणाऱ्या ट्रकला समोर उभ्या असलेल्या ट्रकचा व रिक्षाचा अंदाज आला नाही. त्यामुळे ट्रकने रिक्षाला जोरात धडक दिली. या भीषण अपघातामध्ये रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर रिक्षाचा चुराडा झाला.

अपघात झाल्याचे समजताच पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत दोन्ही ट्रकचालकांना ताब्यात घेतले. अपघातामध्ये मृत्यू झालेल्या रिक्षाचालकाचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. पुढील तपास कासा पोलिस करत आहेत.

Exit mobile version