| मुंबई | प्रतिनिधी |
अनधिकृत भाजीविक्रेत्यांच्या दोन टोळीमध्ये हाणामारी झाल्याची घटना गोरेगाव रेल्वे स्थानकाबाहेर घडली आहे. या घटनेत एका भाजीविक्रेताचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी घडली. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी हल्लेखोर आई-वडील आणि मुलगा या तिघांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मुकेश ब्रिजमोहन कोरे, ब्रिजमोहन देवताप्रसाद कोरे आणि सुशीला ब्रिजमोहन कोरे अशी अटक आरोपींची नावे आहेत. पूर्ववैमनस्यातून वाद होऊन ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.






