कामोठे उड्डाण पुलावरील अपघातात एक ठार, सहा जखमी

| पनवेल | वार्ताहर |
सायन-पनवेल महामार्गावर कामोठे उड्डाणपुलावर मुंबईच्या दिशेने जाणार्‍या लेनवर रविवारी सकाळी आठच्या सुमारास एक विचित्र अपघात घडल्याची घटना घडली आहे. या अपघातात पाच गाड्या एकमेकांवर आदळल्या. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे, तर सहा प्रवासी जखमी झाले आहेत. कामोठे उड्डाणपुलावर मुंबईच्या दिशेने जाणार्‍या लेनवर सकाळी ट्रक बंद पडला होता. हा ट्रक चालू करण्यासाठी काम सुरु होते. याच वेळी मागून भरधाव येणार्‍या वॅगन आर गाडी, इनोवा, एक ट्रक आणि एसटी महामंडळाची शिवनेरी बस एकमेकांवर धडकल्या. त्यात व्हॅगनारमधील एकाचा मृत्यू झाला असून, त्यातील इतर सहप्रवासी व इनोव्हामधील प्रवासी असे जवळपास सहा जण जखमी झाले आहेत. या जखमींवर नजीकच्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Exit mobile version