दोन वेगवेगळ्या अपघातात एक ठार दोन जखमी

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात 1 ठार 2 जखमी झाल्याची घटना घडली आहे. त्यामध्ये पनवेल जवळील राहूल पार्क हॉटेल समोर पळस्पे फाटा येथे एका स्वीफ्ट डिझायर गाडीने मोटार सायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटार सायकलवरील सुरज वाकोडे (30) रा.डेरवली व रजनी वाकोडे (26) हे दोघे जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तर दुसर्‍या अपघातात तळोजा परिसरात एका चार चाकी ट्रोला गाडीवरील चालकाने गाडी मागे घेत असताना वाहनाच्या चाकाचा धक्का शकील हबीब अहमद यांना लागला. या धडकेत त्यांना हाताला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्याने. त्यांना एमजीएम हॉस्पिटल, कामोठे येथे दाखल करण्यात आले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version