तहसीलदार कार्यालयाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यात सोमवार दि. 13 मे रोजी कोरोनाच्या एका नवीन रुग्णाची नोंद झाली तर पाचजण कोरोना मुक्त झाले असून उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती अलिबाग तहसिलदार कार्यालयातून देण्यात आली आहे.
आतापर्यंत अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 23 हजार 291 झाली आहे. यापैकी 630 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 22 हजार 648 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 13 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.







