कर्जत -नेरळ रस्त्यावर ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू

। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत नेरळ राज्यमार्ग रस्त्यावरून भरधाव वेगाने प्रवास करणाऱ्या ट्रक ने रस्त्याने चालत कामावर जाणाऱ्या वाटसरूला धडक दिली आहे. या अपघातात त्या वाटसरूचा मृत्यू झाला असून कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बामणोली गावातील त्या तरुणाच्या अपघाती निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

किरवली ग्रामपंचायत मधील गणेश शांताराम पवार वय २५ हे नेहमीच्या वेळी आपल्या कामाच्या ठिकाणी नेरळ – कर्जत रस्त्याच्या कडेने चालत जात होते. ८ फेब्रुवारी रोजी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास कर्जत कडून नेरळच्या दिशेने जाणाऱ्या एम एच २४८, सीव्ही ७८६५ हा ट्रक भरधाव येत होता. डीमार्ट समोरील मल्हार हॉटेलच्या समोर भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने वाटसरू गणेश शांताराम पवार यांना धडक दिली आणि त्या धडकेत वाटसरू गंभीर जखमी झाला.

रस्त्याच्या परिस्थितीचा विचार न करता ट्रक चालवून त्या ट्रक चालकाने वाटसरूच्या मृत्यूस कारणीभूत झाला आहे. त्या वाटसरूच्या मृत्यूस कारणीभूत असलेला ट्रक चालक हा नालासोपारा येथील रहिवाशी आहे. याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 25/2023 भा.दं.वि.क. 304 A, 279, 337, 338,मोटार वाहन अधिनियम, 1988 चे कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक पोलीस हवालदार वडते करीत आहेत.

Exit mobile version