| रसायनी | प्रतिनिधी |
नढाळ चौक येथील पळसाई धरणात बुडून भोला कुमार सहानी याचा मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी 1.30 वाजता पांडुरंग शिवाजी कांबळे, ओमकार मचले, आनंद हांडा, भोला कुमार सहानी हे नढाळ येथील पळसाई धरणावर पावसाळी मौजमजा करण्यासाठी आले होते. यात भोला कुमार सहानी, रा. नवीन पोसरी, मनोज किराणा बिल्डिंग, मोहोपाडा, ता. खालापूर याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. याबाबतची माहिती स्थानिक अमित जाधव याने स्वप्नील सोनटक्के यांना दिली असता, त्यांनी चौक पोलीस दूरक्षेत्रचे पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार यांच्यासह खोपोली येथील हेल्प फाऊंडेशन यांनाही कळवली. पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार, चौक पोलीस, सिटी ॲम्ब्युलन्सचे अमित गुजरे, स्वप्नील सोनटक्के, अनिकेत गायकवाड, जितू सोनटक्के हे मदतीसाठी पोहोचले. अपघातग्रस्तांना मदतीचा हात सामाजिक संस्था व हेल्प फाऊंडेशन यांच्या टीमने साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नाने मृतदेह शोधून काढला.






