‘रिटघर येथे ‘एक गाव, एक गणपती’

। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यातील रिटघर या गावामध्ये 47 वर्षांपासून एकच गणपती बसविण्याची परंपरा आहे. त्यामुळे गावात सर्वजण मतभेद विसरून गणपतीच्या आरतीला तसेच गणेशाच्या सेवेला हजर होतात. 2016 चा विघ्नहर्ता पुरस्कारदेखील या रिटघरच्या राजाला मिळाला.रिटघर येथे 1975 मध्ये पहिल्यांदा एक गाव एक गणपतीची संकल्पना मांडण्यात आली व त्याच वर्षापासून गावातील मंदिरात एक गणपती बसविण्यात आला. अनाठायी होणारा खर्च कमी व्हावा व आनंदाची प्राप्ती व्हावी तसेच संपूर्ण गाव एकत्रित यावा यासाठी गावातील नागरिकांनी 1975 मध्ये एक गाव, एक गणपती सुरु केला. गावातील हनुमान मंदिरात दरवर्षी गणेशाची मूर्ती बसविली जाते. या मंदिरात सर्व आबाल वृद्ध, ग्रामस्थ, लहान मोठे, महिला हजर असतात. घरोघरी गणेशोत्सव न साजरा करता या काळात ग्रामस्थांनी बसविलेल्या गणपतीचे अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन केले जाते. यामुळे गावकर्‍यांमध्ये एकोपा टिकून राहत असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली.

Exit mobile version