इसमाची ऑनलाईन फसवणूक

| पनवेल । वार्ताहर ।

पनवेल शहरातील एका इसमास कार विकत घेण्याच्या बहाण्याने वेगवेगळ्या फोन वरून कॉल करून दीड लाखांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायदाअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शहरातील उरण नाका येथील रियलइस्टेट व्यापारी दिगंबर पवार (वय 34 वर्षे) यांनी त्यांच्या मालकीची कार एमएच 46 बीच्ही 6509 ही विकण्यासाठी ओ.एल.एक्स ऑनलाइन ऍपवर टाकली होती. त्यांना अज्ञात इसमांनी वेगवेगळ्या मोबाइल वरून फोन करून कोणतेही माहीती न देता त्यांच्या बँक खात्यातून एकूण 1 लाख 48 हजार 994 रूपयाची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायदाअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Exit mobile version