व्यावसायिकाला साडेसहा लाखांचा ऑनलाइन गंडा

| पनवेल | वार्ताहर |

एका व्यावसायिकाला तब्बल 6 लाख 50 हजार रुपयांना गंडा घालण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमित वर्मा हे लॉजिस्टिक्स व्यवसायाशी संबंधित असून, ते ग्रीनफिल्ड रॉयल सीएचएस, कामोठे येथे वास्तव्यास आहेत. वर्मा यांना अनोळखी व्यक्तीकडून ग्राहक केअर प्रतिनिधी असल्याचे भासवून संपर्क साधला गेला. फसवणूक करणाऱ्यांनी एक फाइल पाठवली. ती मोबाइलमध्ये इन्स्टॉल केल्यावर फसवणूक करणाऱ्यांना त्यांच्या मोबाइल व बँक खात्याची माहिती मिळाली. त्यानंतर तत्काळ 6 लाख 50 हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या बँक खात्यातून वळते झाले. ही फसवणूक लक्षात येताच वर्मा यांनी तातडीने कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे करत आहेत.

Exit mobile version