तहसीलदार कार्यालयाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यात आज गुरुवार दि. 3 मार्च रोजी कोरोनाच्या एका नवीन रुग्णाची नोंद झाली आहे. तर आज एका रुग्णानै कोरोनावर यशस्वी मात केली असल्याची माहिती अलिबाग तहसिलदार कार्यालयातून देण्यात आली आहे.
आजपर्यंत अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 23 हजार 225 झाली आहे. यापैकी 629 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 22 हजार 585 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 11 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
