विजय कोकणे यांना विश्वास
। अलिबाग । प्रतिनिधी ।
जन शिक्षण संस्थान रायगड यांच्या माध्यमातून पाणी व्यवस्थापन, कंपोस्ट खत निर्मिती व स्वच्छता जनजागृती या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम 23 जुलै रोजी जे.एस.एस. रायगड संचालक विजय कोकणे यांच्या माध्यमातून एल.एस.पी.एम. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, सीनियर कॉलेज, चोंढी-किहीम, अलिबाग येथे आयोजित करण्यात आला. युवा पिढीच आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करेल, असा विश्वास यावेळी श्री. कोकणे यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाप्रसंगी एल.एस.पी.एम. आर्ट्स ,कॉमर्स, सायन्स, सीनियर कॉलेज, चोंढी -किहीम, अलिबाग येथील विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी पॅडचे व सर्व उपस्थितांना विद्यार्थ्यांना कापडी पिशव्यांचे वाटप करून स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यात आले. ‘कचरा व पाण्याचे सुव्यवस्थापन ही काळाची गरज’ या विषयावरती जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला, तसेच कॉलेजला लागवडीसाठी बांबूच्या रोपांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर स्वच्छतेवर आधारित घोषवाक्य स्पर्धा घेऊन विजेत्यांना प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा किरीट सोमैया, अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, उपाध्यक्ष गीतांजली ओक, संचालक विजय कोकणे व व्यवस्थापक मंडळ यांच्या मार्गदर्शनातून भारत सरकारच्या कौशल्य विकास योजनेंतर्गत कार्यक्रम राबवित असताना या कार्यक्रमाप्रसंगी जन शिक्षण संस्थान रायगडचे संचालक विजय कोकणे, बोर्ड मेंबर अॅड. नीला तुळपुळे, प्रा. लिना पाटील, संस्थेचे कार्यवाह रवींद्र ठाकूर, एनएसएस प्रोग्राम ऑफिसर सचिन गोंधळी व प्रवेश पाटील, प्रा. प्रतिजा कोटीयन व प्रा. सायली राऊत (महिला सक्षमीकरण विभाग), अकाउंट मॅनेजर प्रतीक्षा चव्हाण, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सुकन्या नांदगावकर तसेच प्रा. श्रद्धा पाटील, विद्या घरत, हर्षदा पुनकर, प्रांजली पडते, राजश्री कदम, नितेश पाटील, चिंतन पोतदार, दर्शना तोडणकर, तृप्ती खोत, कर्मचारी हिमांशू भालकर, गितेश ठकरूळ, स्वप्निल माने आदी मान्यवर व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत जनजागृती कार्यक्रम कोरोनाजन्य परिस्थितीचे सर्व नियम पाळून उत्साहात पार पडला.
0000