| नवी दिल्ली | वार्ताहार |
गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये आशिया चषकाबाबत वाद सुरू आहे. त्याचवेळी पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे प्रमुख नजम सेठी यांनी एकदिवसीय विश्वचषकाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना आगामी आशिया चषक खेळण्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानात आला तर आमचा संघ एकदिवसीय विश्वचषक खेळण्यासाठी भारतात जाईल, असे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे.