खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाला सुरुवात

| आगरदांडा | प्रतिनिधी |

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभर सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने मुरुड-जंजिरा नगरपरिषद तर्फे सदरचे सर्वेक्षणाला मंगळवार (दि.23) पासून सुरुवात झाली आहे. या सर्वेक्षणाकरिता नगरपरिषद कर्मचारी व शिक्षकांमार्फत आज पासून ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत होणार आहे. या कालावधीत नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी घरोघरी जाऊन कुटूंबाची माहिती घेणार आहेत. सर्वेक्षणा दरम्यान केवळ मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटूंबाची माहिती प्रश्‍नावलीव्दारे भरून घेतली जाईल. कुटूंब आरक्षित प्रवर्गातील असल्याची माहिती प्रगणकाला मिळाल्यानंतर त्या कुटूंबाची पुढील माहिती घेतली जाणार नाही.

सर्वेक्षणाचा कालावधी कमी असल्याने प्रगणक सकाळी लवकर अथवा सायंकाळी उशिरा सर्वेक्षणासाठी येऊ शकतात. तरी नागरीकांनी सर्वेक्षणाकरीता येणार्‍या प्रगणकांना आवश्यक ती माहिती देऊन सर्वेक्षणास सहकार्य करावे असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज अनिल भुसे यांनी केले आहे.

Exit mobile version