पनवेल परिसरात खुलेआम मद्यविक्री

। पनवेल । वार्ताहर ।
ढाब्यांवर मद्यपान करण्यास मनाई असताना देखील पनवेल परिसरातील ढाब्यांवर मोठ्या प्रमाणात मद्यपान केले जात आहे. विशेष म्हणजे ढाबा चालकच मद्य पुरवठा करताना दिसत आहेत. तर काही ढाब्यांवर मद्य विक्री सुरु असल्याचे दिसून येत आहे. त्यामुले अशा पकारे बेकायदेशिर धंदे करनारया विरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. पनवेल परिसरातील ढाब्यांवर मद्यपान करुन मद्यपी खुलेआम धिंगाणा घालत आहेत. परिसरातील सुकापूर, नवीन पनवेल, शिरढोण, पळस्पे, आदि ठिकाणी मोठ्या प्रमाणात ढाबे आहेत. येथील ढाब्यांवर मद्यपान केले जात असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मद्यपींची जत्रा भरते. त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी गस्त घालावी व अशा हॉटेल व बारचालकांवर उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून केलीजात आहे.

Exit mobile version