| पनवेल । प्रतिनिधी ।
मुंब्रा – पनवेल महामार्गांवर असणार्या मद्य विक्री दुकानानंबाहेर खुलेआम मद्य पार्ट्या रंगत आहेत. मद्य विक्री दुकाना बाहेर मद्यपिंच्या सोयी करता सुरु करण्यात आलेल्या खाद्य पदार्थ विक्री दुकानातच मद्य पान केले जात असून देखील स्थानिक पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागा कडून केल्या जात असलेल्या दुर्लक्षा मुळे उघड्यावर सुरु असलेल्या या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे.महामार्गांवर होणार्या अपघाता मध्ये अति मद्यपान करून वाहन चालवल्यामुळे होणार्या अपघातांची संख्या मोठी आहे.हे अपघात रोखण्यासाठी महामार्गा लगत असलेली मद्य विक्री करणारी दुकानें बंद करण्याचे आदेश न्यायालयाने काही वर्षा पूर्वी दिले होते.
कालांतराणे न्यायालयाने हे आदेश मागे घेतल्याने महामार्गा लगत असणारी बंद झालेली दुकानें पुन्हा सुरु झाली आहेत.या मध्ये मुंब्रा – पनवेल महामार्गांवरील काही दुकानानचा देखील समावेश असून, पनवेल पालिका हद्दीतील खुटारी गाव, नावडे वसाहत त्याच प्रमाणे कळंबोली वसाहतीचा देखील समावेश असून या ठिकाणी सुरु असलेल्या मद्य विक्री दुकाना बाहेर मद्यपिन कडून खुलेआम मद्यपान केले जात आहे. मद्यपिंकडून सुरु असलेल्या या प्रकाराकडे गंभीरतेने पाहून माध्यपानाचे हे कार्यक्रम रोखण्यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत अशी मागणी सामान्य नागरिक करत आहेत.
नियमांचे उल्लंघन
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमानुसार मद्य विक्री दुकानाच्या आवारात मद्यपान करण्यास बंदी आहे. ग्राहकाने दुकानातून विकत घेतलेले मद्य इतरत्र जाऊन पिणे अपेक्षित आहे. मात्र पनवेल पालिका हद्दीतील खुटारी, नावडे वसाहत आणि कळंबोली येथील दुकाना बाहेर या नियमांचे उल्लंघन केले जात आहे.
पालिकेचे दुर्लक्ष
माद्यपिंची सोय म्हणून मद्य विक्री दुकाना बाहेर खाद्य पदार्थ विक्री, थंड पेय विक्री आणि पाणी विक्री करणारे स्टॉल लावण्यात आले आहेत. मोठ्या संख्येने सुरु असलेल्या या स्टॉलवर कारवाई करण्यास पालिकेचे अतिक्रमण विभागाचे कर्मचारी देखील टाळाटाळ करताना दिसत आहेत.