| पनवेल । वार्ताहर ।
सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिक सज्ज झाले असून वर्ष अखेर खवय्यांकडून थर्टी फर्स्टचे बेत आखण्यात येतात. यंदा करोना नंतर दोन वर्षाच्या दरम्यान आता सर्व निर्बंध हटवले असल्याने यंदाच्या थर्टी फर्स्ट पार्ट्या जल्लोषात साजर्या करण्यात येत आहे. त्यामुळे थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मांसाहाराची मागणी वाढली आहे. त्यातच कडाक्याची थंडीही पहावयास मिळत आहे . त्यामुळे सर्व स्तरातून माणस आहाराला मागणी वाढल्याने मासळीच्या दरात प्रति किलो 300 ते 400 रुपयांची दरवाढ झालेली आहे. मासांहारवर ताव मारणार्यांना अधिक पैसे मोजावे लागणार आहे.
मासळी मध्ये पापलेट, सुरमई, आणि कोळंबी याला आधील पसंती दिली जाते. त्यामुळे यांच्या घाऊक दरात 300-400 रुपयांची वाढ झाली आहे. घाऊक बाजारात सुरमई प्रतिकिलो 500रुपयांनी उपलब्ध होती ती आता 700-800 रुपयांवर पोचली आहे . पापलेट हीमहागले आहेत तर कोळंबी 400 रुपयांवरून 600-650रुपयांवर उपलब्ध आहे. सरते वर्ष आणि नवीन वर्ष स्वागत उत्सव या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यवसायिकांनी देखील मांसाहाराच्या मेनूमध्ये वाढ केलेली आहे. त्यामुळे एकंदरीतच मांसाहार खवय्यांप्रेमींना मांसाहार ताव मारण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.