। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
ज्ञान प्रदाय शिक्षण संस्था आंबेवाडी कोलाड यांचे माध्यमातून शिरीष अनप्लग संगीत अकॅडमी पुरस्कृत स्थानिक मुलांसाठी डान्स अकॅडमी सुरु करुन दालन उपलब्ध करून देण्याचे काम शिरीष शिवराम महाबळे व रॉनी पठार यांच्या माध्यमातून सुरु करण्यात आले आहे. या डान्स अकॅडमीचे उदघाटन प्रो.डॉ.सागर सानप व शिवरामजी महाबळे यांच्या हस्ते करण्यात आले. शिक्षणा बरोबरच विद्यार्थ्यांच्या कळागुणांना वाव मिळावा यासाठी या डान्स अकॅडमी सुरु करण्यात आली असल्याचे मत संस्थेचे संस्थापक शिवरामजी महाबळे यांनी व्यक्त केले.