| कोर्लई | वार्ताहर |
मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.ए.नगरबावडी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेच्या सातदिवसीय श्रम संस्कार शिबिराचे उद्घाटन जोसरांजण येथे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गायकर यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांना श्रम संस्काराचे महत्व कळावे यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यरत आहेत. त्याचाच भाग यंदा या योजनेअंतर्गत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास हे ब्रिद घेऊन जोसरांजण येथे दि.19 ते दि.25 जानेवारी या कालावधीत सात दिवसीय श्रम संस्कार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये श्रमदान, निर्मल ग्रामस्वच्छता, वनराई बंधारा, आधार कार्ड, मतदार नांव नोंदणी सर्वे एड्स जनजागृती, व्यसन मुक्ती पथनाट्य इ.कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी महाविद्यालय समिती सदस्या वासंती उमरोटकर, आदेश भोईर, उपप्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण, आशिका पाटील, प्रा डॉ एस.एस.भैरगुंडे, प्रा. डॉ. जी. डी. मुनेश्वर, ओमकार राजपूरकर, आशिष पाटील, गौरी विरकुड, अवंतिका देवलकर, लक्ष्मण भुदे, पांडुरंग ठाकूर, नितीन गायकर, संदीप गायकर, गणेश गायकर, संजय ठाकूर, विद्याधर नाईक ग्रामस्थ शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैष्णवी राजपूरकर यांनी तर गौरी विरकुड यांनी आभार मानले.
श्रम संस्कार शिबिराचे उद्घाटन
