। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबााग रायवाडी कॉम्प्लेक्स येथे रविवारी (दि. 1) सकाळी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत उद्यानाचे उदघाटन पार पडले. या उद्यानाचे उद्घाटन अलिबाग माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या उद्यानात वृक्षारोपणही करण्यात आले. या उद्यानामध्ये बालोद्यान,कॅरम बोर्ड, जॉगिंग ट्रॅक, ओपन जिम, बॅडमिंटन कोर्ट याचा समावेश आहे. यावेळी माजी उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे, माजी ज्येष्ठ नगरसेवक प्रदीपनाईक, अनिल चोपडा, अजय झुंजारराव, संजना किर, अंगाई साळुंखे, अक्षया नाईक, रायवाडी कॉम्प्लेक्स रहिवासी मंडळ अध्यक्ष संजय धारिया, रायवाडी कॉम्प्लेक्सचे रहिवासी व अलिबागकर उपस्थित होते. सूत्रसंचालन रमेश धनावडे यांनी केले. तर, रवींद्र थळे यांनी आभार प्रदर्शन केले.यावेळी बोलताना माजी उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे यांनी या उद्यानाचा विनियोग योग्य प्रकारे केला जावा, तसेच नियमित स्वच्छता राखली जावी, अशी सूचना केली.