लायन्स क्लब पोयनाडतर्फे नेत्रचिकित्सा शिबीर

| अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
लायन्स क्लब पोयनाडच्यावतीने लक्ष्मी ज्वेलर्स, पोयनाडचे नरेश जैन आणि लता जैन यांच्या विवाहाच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार (29) लायन्स व्हीजन ऍण्ड हेल्थ क्लीनिक, आंबेपूर-पेझारी येथे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 130 नेत्ररुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यांच्यातील 35 जणांमध्ये मोतीबिंदू आढळला. या मोतीबिंदू रुग्णांवर चोंढी येथील लायन्स हेल्थ फाऊंडेशनच्या डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

या शिबिराचे उद्घाटन मुकेश तनेजा यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अनिल जाधव, प्रदीप सिनकर, अनिल म्हात्रे, नयन कवळे, विकास पाटील, उपाध्यक्ष प्रमोद राऊत, कौस्तुभ जोशी, दिलीप गाटे, प्रगती सिनकर, अरविंद अग्रवाल, संतोष पाटील, विनोद पाटील, हेमंत पाटील, डॉ. शुभदा कुरतडकर, बी.एन. कोळी, सुमीत पाटील, विनोद पाटील, मोहन पाटील, अजय आंगणे, महेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी लायन्स क्लब पोयनाडचे अध्यक्ष विकास पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून आपल्या संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. सूत्रसंचालन लायन्स हेल्थ फाऊंडेशनच्या डोळ्यांच्या हॉस्पिटलच्या मुख्याधिकारी डॉ. शुभदा कुरतडकर यांनी केले.

Exit mobile version