मोठे शहापूर येथील नेत्रचिकित्सा शिबिरात ५५ जणांची नेत्रतपासणी

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
लायन्स क्लब पोयनाड ही समाजसेवी संस्था पोयनाड पंचक्रोशीत वंचित, दीनदुबळ्यांसाठी विविध उपक्रम राबविते. या उपक्रमातर्गत लायन्स क्लब पोयनाड आणि हेल्थ फाउंडेशन चोंढी-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोठे शहापूर येथे पंचक्रोशीतील गरजू बांधवांसाठी मोफत नेत्रचिकित्सा व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

श्रीगणेश मंदिर सभागृह, मोठे शहापूर येथे शनिवार, २२ जानेवारी रोजी हे नेत्रचिकित्सा व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात एकूण ५५ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. यापैकी २० जणांंच्या डोळ्यात मोतीबिंदू आढळून आले. त्यांच्यावर चोंढी येथील लायन्स हेल्थ फाऊंडेशनच्या डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. हेल्थ फाउंडेशन चोंढी-अलिबागच्या डाॅ. समिता चोगले आणि डाॅ. प्रणिता कुथे यांच्या पथकाने ही नेत्रतपासणी केली. या शिबिराकरीता जीएमपी नोडल अधिकारी प्रदीप सिनकर, डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन मनीष अग्रवाल, अक्टीव्हिटी कोऑर्डिनेटर अरविंद अग्रवाल, लायन्स क्लब पोयनाडचे अध्यक्ष प्रमोद पाटील, सचिव प्रगती सिनकर, खजिनदार विकास पाटील, दीपक जैन यांच्यासह इतर सदस्यांनी मेहनत घेतली.

Exit mobile version