| रसायनी | वार्ताहर |
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मोहोपाडा येथील श्री साईबाबा मंदिर हॉलमध्ये मनसे रायगड जिल्हा उपाध्यक्ष दीपक कांबळी यांनी आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात विविध क्षेत्रातील 35 कंपन्यांनी सहभाग घेतला होता. मेळाव्याचे उद्घाटन पाताळगंगा रसायनी इंडस्ट्रियल असोसिएशन (प्रिआ)चे अध्यक्ष सुनील कदम यांच्या हस्ते करण्यात आले. या मेळाव्यात साडेतीनशे तरुण-तरुणीने लाभ घेतला. मेळाव्यात नोकरीसाठी निवड झालेल्यांना आयोजकांनी प्रमाणपत्र दिले, मेळाव्यात 62 जणांची निवड झाली. उर्वरित तरुण-तरुणींना ज्याप्रमाणे कंपन्यांमध्ये भरती निघेल, त्याप्रमाणे कळवण्यात येईल, असे आश्वासन दीपक कांबळी यांनी आपल्या भाषणात बोलताना दिले.
याप्रसंगी विविध पक्षांतील गजानन माळी, संदीप मुंढे, कृष्णा पारंगे, दत्ता शिंदे, गजानन मांडे, अमित शहा,अनिल पिंगळे, संतोष पाटील, अरुण गायकवाड, प्रदीप पाटील, आर डी पाटील, सिताराम पाटील, प्रकाश माळी, मिनेश गाडगीळ, विजय जगदाळे, सुधीर शिंदे, हिंदुराव बाबर, मिलिंद जोशी, के.टी. राणे आदी मान्यवर उपस्थित होते. त्याचप्रमाणे सदर कार्यक्रमास मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, पनवेल तालुकाध्यक्ष रामदास पाटील, पर्यावरण जिल्हाध्यक्ष अभिजीत घरत यांनी भेट दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनसेचे फुलचंद लोंढे, भास्कर डुकरे, अनिकेत गोजे, सूर्यकांत पडवळ, विशाल निंबाळकर, समीर म्हात्रे, सचिन घेवारे, जयदास पाटील, अर्जुन डुम्बरे, मनोज जाधव, संतोष वेदपाठक, सागर घेवारे, प्रज्योत लोंढे, राज पडवळ, दीपक काळोखे, किशोर शेगर त्याचप्रमाणे एसीई ह्युमन कॅपिटल लि. यांचे विशेष सहकार्य लाभले.