लॉ कॉलेजमध्ये वक्तृत्व स्पर्धा

| अलिबाग | प्रतिनिधी|

महर्षी न्यायरत्न विनोद यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार (दि. 12) जानेवारीला अलिबागमधील लॉ कॉलेजच्या सभागृहात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. खुल्या गटातील या स्पर्धेला रायगडसह अन्य जिल्ह्यातील स्पर्धकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत 30 हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.

ॲड. श्रीराम ठोसर आणि आदिती वैद्य यांच्या पुढाकाराने आयोजित स्पर्धेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा भविष्यात मानवी जीवनावर होणारा परिणाम. श्रीराम चरित्रातून आपण काय शिकावे? ज्येष्ठ नागरिक ही समाजाची संपत्ती की जबाबदारी? नियंत्रणहीन दृकश्राव्य माध्यमांचा समाज मनावर होणारा परिणाम. लोकशाही मूल्यांचे जतन करण्यासाठी नागरिकांचे योगदान या विविध विषयांवर स्पर्धा घेण्यात आली. एकूण स्पर्धेत तीसहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेतील प्रथम क्रमांकास रोख पाच हजार रुपये व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकाला रोख चार हजार रुपये व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकाला तीन हजार रुपये व प्रमाणपत्र, चतुर्थ क्रमांलाकाला रोख दोन हजार रुपये व प्रमाणपत्र तसेच पाचव्या क्रमांकाला रोख एक हजार रुपये व प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.

Exit mobile version