पेण येथे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

| खरोशी | प्रतिनिधी |

विविध उपक्रमांच्या माध्यमातून व्यापक प्रबोधन करुन समाजाचं ऐक्य घडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या अखिल भारतीय आगरी समाजिक संस्थेच्या सातव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून येत्या (दि.25) मे रोजी सकाळी ठीक 11 वाजता पेण येथील आगरी समाज सभागृहात आगरी समाजातील स्त्री-पुरुषांसाठी खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेमध्ये संस्थेने खालील सामाजिक विषय ठेवले आहेत. यामध्ये आगरी समाजाच्या अधोगतीला असंघटितपणा कारणीभूत. आगरीबहुल इलाख्यातला विकास समाजाला शाप की वरदान, नोकरभरती स्थानिकांवर अन्याय: शासनकर्त्यांची उदासीनता की लोकप्रतिनिधींचा नाकर्तेपणा, आजची तरुणाई भविष्याच्या विचारांपासून भरकटतेय. आगरी लोकपरंपरा आणि लोकसंस्कृतीचा होतो आहे र्‍हास. यापैकी कोणत्याही एका विषयावर स्पर्धकाला आपले विचार मांडता येतील. स्पर्धकांनी विहित वेळेत उपस्थित राहून नोंद करायची आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. विषय, आशय आणि सादरीकरण या निकषांवर विजेत्याची निवड होईल. प्रथम येणार्‍या पाच स्पर्धकांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र अशी बक्षिसे देण्यात येतील.

तरी स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणार्‍या स्पर्धकांनी आपली नावे (दि.15) मेपर्यंत आल्हाद पाटील-पनवेल 7045444197, नलिनी पाटील-ठाणे- 9004357650, कल्पना टेमकर- नागोठणे-9970893471, पी.वाय. पाटील-पेण- 9422495362 यांच्याकडे नोंदवावीत, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

Exit mobile version