। पेण । प्रतिनिधी ।
पेण तालुक्यातील नवघर अंगणवाडीमध्ये चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वक्तृत्व स्पर्धेत मुलांनी वक्तृत्व करून जमलेले ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, शिक्षकांची मने जिंकली.
स्पर्धेमध्ये निरव देवेंद्र कोळी याने प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच द्वितीय गणेशा दर्शन कोळी, तृतीय अक्षय कोळी, तर चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम राणी अक्षय कोळी, द्वितीय साईनाथ समाधान कोळी यांनी पारितोषिके मिळवली.
यावेळी ग्रामसेवक के.पी.पाटील व जनाबाई भोईर, आरती कोळी, राजेंद्र कोळी उपस्थित होते. परीक्षक म्हणून टिळक म्हात्रे व विकास म्हात्रे यांनी काम पाहिले.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी सेविका पुनम पाटील व मदतनीस वैशाली कोळी यांनी मेहनत घेतली.